Home > News Update > डिसेंबर २०२३ पर्यत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार...

डिसेंबर २०२३ पर्यत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार...

गेल्या वर्षानूवर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर येथे सांगितले.

डिसेंबर २०२३ पर्यत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार...
X

मुंबई-गोवा महामार्गा संदर्भात कोल्हापूर मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबई-गोवा हा महामार्ग तयार होणास अनेक अडचणी येत आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेण्याचे काम गडकरी यांनी कोल्हापूरच्या दौऱ्यावर केले. या महामार्गाच्या कामामध्ये कंत्राटदाराने अडचणी निर्माण केल्यामुळे महामार्गाचे काम रखडल्याचे समोर आले आहे. मोठ्या पुलांची काही कामे प्रलंबित असून या वर्षा अखेरीस हे रस्ते पूर्ण होतील असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. यासोबतच पेण जवळ एक ट्रौमा सेंटर देखील उभारण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी या बैठकीनंतर दिले.

अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांना विचारला असता, गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यत पूर्ण होईल, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिले आहे. पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम केंद्र सरकारने एमएचएआय करीत आहे.

संबंधित उर्वरित काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गावर वाहतूककोंडी व अपघात होऊ नयेत, यादृष्टीने वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी कंत्राटदाराकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती एनएचएआयच्या संचालकांनी दिली आहे. त्यामुळे आगामी २०२३ च्या डिसेंबरपर्यत मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होईल, अशा सर्वांना आशा आहे.

Updated : 10 Feb 2023 12:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top