Home > News Update > पॅरासेलिंग करताना दोर तुटून महिला समुद्रात पडल्या

पॅरासेलिंग करताना दोर तुटून महिला समुद्रात पडल्या

पॅरासेलिंग करताना दोर तुटून महिला समुद्रात पडल्या
X

पॅरासेलिंग करताना दोर तुटल्याने दोन महिला समुद्रात पडल्याची घटना अलिबाग तालुक्‍यातील वरसोली येथील समुद्रकिनारी घ़ली आहे. सुदैवाने या दोन्‍ही महिला बचावल्‍या आहेत. मात्र यामुळे पर्यटकांच्‍या सुरक्षेचा मुददा ऐरणीवर आला आहे. 27 नोव्‍हेंबर रोजी मुंबईतील साकीनाका येथील काहीजण फिरण्यासाठी अलिबागला आले होते. त्‍यातील दोन महिला पॅरासेलींग करण्‍यासाठी गेल्‍या. पॅरासेलींग करताना अचानक दोर तुटल्‍याने त्‍या दोघी खाली पाण्‍यात कोसळल्‍या त्‍यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बोटीवरील जीवरक्षकांनी दोघींनाही सुखरूप बाहेर काढले. यात कोणतही जीवीत हानी झाली नसली तरी पर्यटक आणि व्‍यावसायिकांनी सुरक्षेच्‍या सर्व उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Updated : 4 Dec 2021 3:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top