Home > News Update > दोन ठेऊन देईन, आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या युवकाला मोदी सरकारच्या मंत्र्यांची धमकी...

दोन ठेऊन देईन, आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या युवकाला मोदी सरकारच्या मंत्र्यांची धमकी...

दोन ठेऊन देईन, आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या युवकाला मोदी सरकारच्या मंत्र्यांची धमकी...
X

भोपाळ: देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातच अनेक रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याने अनेक रुग्णांना वेंटिलेटर ठेवावं लागत आहे. त्यातच ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थिती मोदी सरकारच्या मंत्र्याने ऑक्सिजन मागणाऱ्या एका व्यक्तीला दोन झापड मारण्याची धमकी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. ऑक्सिजनच्या कमतरतेवरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी दोन झापड मारण्याची धमकी या रुग्णाच्या नातेवाईकाला दिली. सध्या देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्ली मध्ये ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. अशा परिस्थिती रुग्णांचे नातेवाईक २४ -२४ तास ऑक्सिजन मिळावा म्हणून रांगेत उभा आहेत.

केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल कोरोना संक्रमित रुग्णांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा लोकांनी त्यांच्याकडे ऑक्सिजनबाबत तक्रार केली असता, मंत्र्यांनी त्याला दोन झापड ठेवून देईल असं सांगितलं. विशेष म्हणजे यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी देखील तिथं होते.

आता संबंधित मंत्र्यांच्या विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून सदर व्यक्ती डॉक्टर आणि नर्सच्या विरोधात अभद्र भाषेचा वापर करत असलेल्या व्यक्तीला रोखले. ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये व्यक्ती म्हणतो हे सगळे वेड्यात काढत आहेत. 36 तास झाले आम्ही त्रस्त आहोत. हे म्हणत आहेत की सिलेंडर देऊ मात्र, असं झाले नाही. हे स्पष्टपणे का नाही सांगत ऑक्सिजन नाही. अशी तक्रार करताच मंत्री म्हणाले… असं बोलशील तर आत्ता दोन खाशील यावर युवक म्हणाला...

खाईल सर माझी आई इथं पडली आहे. त्यानंतर भानावर आलेल्या मंत्र्यांनी काय तुला कोणी ऑक्सिजन सिलेंडर घ्यायला मनाई केली आहे. यावर युवक म्हणाला फक्त ५ मिनिटं ऑक्सिजन दिला आहे. जर ऑक्सीजन मिळत नसेल तर हॉस्पिटलने जाहीर करावं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मोदी सरकार विरोधात लोक संताप व्यक्त करत आहे. या संदर्भात NDTV या वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.

Updated : 23 April 2021 9:25 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top