Home > News Update > Sachin Vaze case: दोन व्यक्तींना अटक, कोण आहेत संतोष शेलार आणि आनंद यादव?

Sachin Vaze case: दोन व्यक्तींना अटक, कोण आहेत संतोष शेलार आणि आनंद यादव?

Sachin Vaze case: दोन व्यक्तींना अटक, कोण आहेत संतोष शेलार आणि आनंद यादव?
X

मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटक भरलेली कार सापडल्यानंतर या केसमध्ये दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. स्फोटक भरलेल्या कारचे मालक मनसुख हिरेण यांच्या कथित हत्या प्रकरणात NIA ने दोन संशयीत व्यक्तीला अटक केली आहे. या दोनही संशयीत आरोपींची नाव संतोष शेलार आणि आनंद यादव असे आहेत.

दोनही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात दाखल केले. न्यायालयात NIA ने या आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींना 21 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या सर्व प्रकरणात निलंबीत पोलिस निरिक्षक सचिन वाझे मुख्य आरोपी आहे. NIA सध्या या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणात किती लोकांचा समावेश आहे. याचा तपास सध्या NIA करत आहे.

आत्तापर्यंत या प्रकरणात सचिन वाझे सह पोलिस निरिक्षक सुनिल माने, सहाय्यक उप निरीक्षक रियाज काजी आणि हवालदार विनायक शिंदे यांना पोलिस सेवूतून निलंबीत केलं आहे.

फेब्रूवारी 2021 मध्ये मुंबईतील मुंकेश अंबानी यांच्या Antilia घराबाहेर एक कार सापडली होती. (Antilia case) या कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक आढळली होती. या कारचा मालक मनसुख हिरेण यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानं या सर्व प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

Updated : 15 Jun 2021 4:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top