मुंबईतील माटुंगा स्टेशनवर दोन एक्सप्रेसची धडक
मुंबईतील माटुंगा स्थानकावर दोन रेल्वे आमने सामने आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
X
मुंबईतील माटुंगा स्थानकावर दोन रेल्वे आमने सामने आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
माटुंगा स्टेशनवर उभ्या असलेल्या पाँडिचेरी एक्सप्रेसला गदग एक्सप्रेसने धडक दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
माटुंगा स्टेशनवर पाँडिचेरी एक्सप्रेस उभी होती. त्याला गदग एक्सप्रेसच्या इंजिनने धडक दिली. त्याचा मोठा आवाज झाला. त्यावेळी गदग एक्सप्रेसमधील प्रवाशांनी गाडीबाहेर उड्या घेतल्या. त्यामुळे मोठी मनुष्यहानी टळली.
गदग एक्सप्रेस आणि पाँडिचेरी एक्सप्रेसच्या झालेल्या अपघातामुळे मुंबईतील जलद मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पाँडिचेरी एक्सप्रेस ही माटुंगा स्टेशनवर उभी होती. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सकडून आलेल्या गदग एक्सप्रेसने पाँडिचेरी एक्सप्रेसला मागच्या बाजुने धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. मात्र या अपघातात कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आली नाही.
दोन ट्रॅक एकमेकांना क्रॉस करत असल्याच्या ठिकाणी ही धडक झाल्यामुळे पाँडिचेरी एक्सप्रेसच्या मागच्या बाजूचे तीन डबे रुळावरून घसरले. मात्र यामध्ये कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आली नाही.
या अपघाताबाबत अधिकृत माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.