उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूचं ब्लू टीक पूर्ववत
X
ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटचं ब्लू टीक हटवलं होतं. ट्वीटरने व्यंकय्या नायडू यांचं ब्लू टीक हटवल्याची बाब समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर ट्वीटरने पुन्हा एकदा ते पुर्ववत केलं आहे.
नायडू यांच्या अकाउंटवरील ब्लू टीक काढलं म्हणजे त्यांचं अकाउंट अनव्हेरिफाइड (Unverified) करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) एक नवा वाद निर्माण झाला होता.
NDTV चे वरिष्ठ पत्रकार अखिलेश शर्मा (Akhilesh Sharma) यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली होती. त्यांच्या ट्विट मध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटचा स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी शेअर केला आहे, ते म्हणतात –
भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टीक हटवून त्यांचं अकाउंट अनव्हेरिफाइड (Unverified) करण्यात आल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे
भारत के उपराष्ट्रपति एम वेंकैय्या नायडू के ट्विटर अकाउंट से 'ब्लू टिक' हटा कर उसे 'unverified' कर दिया गया। @MVenkaiahNaidu @TwitterIndia @Twitter pic.twitter.com/AJhTlbYpHF
— Akhilesh Sharma (@akhileshsharma1) June 5, 2021
ट्विटरच्या या कारनाम्यानंतर भाजप नेते सुरेश नाखुआ यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत, ते म्हणतात - उपराष्ट्रपतींच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विटरने ब्लू टीक का हटवलं? हा भारताच्या संविधानावर हल्ला आहे. भाजप नेत्यांव्यतिरिक्त अनेक ट्विटर यूजर्सने देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे.
ट्विटरने काय म्हटलंय?
गेल्या काही महिन्यांपासून हे अकाऊंट लॉग इन झालं नव्हतं म्हणून त्यावरील ब्लू टीक गायब झाल्याचं ट्विटरनं म्हटलं आहे.
दरम्यान सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रियांमुळे काही तासांतच या अकाऊंटवर ब्लू टीक पुन्हा दिसू लागलं. व्यंकय्या नायडू यांचं ट्विटर अकाऊंट जुलै २०२० पासून कार्यरत नसल्याचं दिसून येत आहे.
नवीन सोशल मीडिया गाईडलाईन्स (Social Media Guidlines) आल्यानंतर ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरु आहे. आणि अशात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टीक हटवल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.