Home > News Update > Twitter नं Blue Tick हटवली; नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना फटका...

Twitter नं Blue Tick हटवली; नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना फटका...

ट्विटरने (Twitter) काल 20 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून अनेकांच्या ब्लू टिक्स (Blue Tick) काढून टाकल्या आहेत. ट्विटर ब्लू प्लॅनसाठी (twitter blue plan) पैसे न देणाऱ्या खात्यांच्या कंपनीने ब्लू टिक्स काढून टाकले आहेत. त्यात यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ, क्रिकेटर विराट कोहली, रोहित शर्मा, अभिनेता अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार अशा अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.

Twitter नं Blue Tick हटवली; नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना फटका...
X

कंपनीचे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांनी 12 एप्रिल रोजीच याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते, 'लेगसी ब्लू चेकमार्क काढण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल आहे.' खरतर ट्विटरने या ट्विटरने याआधी १ एप्रिलपासून लिगेसी चेकमार्क काढून टाकण्याची तारीख निश्चित केली होती. आता ट्विटरने काल रात्री अनेकांच्या blue- mark काढून घेतला आहे यात अनेक दिग्गजांचा समावेश आहे.. यामध्ये कोणाकोणाच्या. ब्लू-टिक गेल्या आहेत पाहुयात..

भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) याची देखील Twitter blue tick गेली आहे..





उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नावापुढे देखील आता blue tick नाही..





भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना देखील ट्विटर blue tick ला मुकावं लागलं आहे..





महानायक अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या देखील नावापुढे आता blue tick नाही आहे..





सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार अशा अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे...











ट्विटर ब्लू प्लॅनसाठी पैसे न देणाऱ्या खात्यांच्या कंपनीने ब्लू टिक्स काढून टाकल्या आहेत.

मस्कयांना २०२३ च्या अखेरीस ट्विटरला आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे आहे. महसूल वाढवण्यासाठी त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शनसारख्या काही सेवांमध्येही बदल केले आहेत. भारतातील Android आणि iOS मोबाईल वापरकर्त्यांना ब्लू सबस्क्रिप्शनसाठी दरमहा 900 रुपये द्यावे लागतील.

वेब वापरकर्त्यांना 650 रुपयांमध्ये ब्लू सबस्क्रिप्शन मिळेल. वेब वापरकर्त्याने वार्षिक सबस्क्रिप्शन घेतल्यास त्याला सूट मिळेल. 7 हजार 800 ऐवजी 6 हजार 800 भरावे लागतील. वार्षिक सदस्यता योजना मोबाइल वापरकर्त्यांसाठी नाही.

ब्लू सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांना टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची सुविधा मिळेल..

20 मार्चपासून, ट्विटर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) हे सुरक्षा वैशिष्ट्य बंद करण्यात आले आहे. आता ते फक्त ब्लू सबस्क्रिप्शन असलेल्या ग्राहकांना दिले जात आहे. 2FA द्वारे खाते अधिक सुरक्षित करण्यासाठी, खातेधारकाला पासवर्ड व्यतिरिक्त दुसरी प्रमाणीकरण पद्धत वापरावी लागेल.

Updated : 21 April 2023 12:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top