Home > News Update > माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांना ट्विटरने अकाऊंट वापरण्यापासून रोखलं

माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांना ट्विटरने अकाऊंट वापरण्यापासून रोखलं

माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांना ट्विटरने अकाऊंट वापरण्यापासून रोखलं
X

नवीन IT नियमांवरुन केंद्र सरकार आणि ट्विटर आमनेसामने असताना ट्विटरने केलेल्या एका कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी US Digital Millennium Copyright Act चे उल्लंघन केल्याचे कारण देत ट्विटर अकाऊंट रोखण्यापासून तासभर रोखले, अशी माहिती स्वत: रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. प्रसार यांनी koo या डिजिटल प्लॅटफटर्मवर ही माहिती दिली. रवीशंकर प्रसाद यांनी ट्विटरचा वापर करताना US Digital Millennium Copyright Act चे उल्लंघन केल्याचे कारण ट्विटरने दिले आहे. रवीशंकर प्रसाद यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर DMCA कायद्याचे उल्लंघन होईल असा मजकूर टाकल्याचे ट्विटरनने म्हटले आहे. तसेच DMCA अधिकृत नोटीस आल्यानंतर रवीशंकर प्रसाद यांच्या अकाऊंटचवरील आक्षेपार्ह पोस्ट काढण्यात येईल असेही ट्विटरने नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. एवढेच नाही तर सतत तीनवेळा अशाप्रकारे उल्लघंन झाले तर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केले जाईल असा इशाराही ट्विटरने दिला आहे.


केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नवीन माहिती आणि तंत्रज्ञान नियमांवरुन ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष सुरू आहे. ट्विटरने केंद्राच्या नोटिशीला उत्तर न दिल्याने सरकारने कारवाईचा इशारा दिला होता. तसेच ट्विटरच्या अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरच्या कारवाईबाबत नेटिझन्सनीही काही गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.


दरम्यान संसदीय समितीचे अध्य़क्ष शशी थरुर यांनी आपलेही अकाऊंट अशाचप्रकारे रोखले गेल्याचे सांगितले आहे. DMCA एवढ्या तातडीने कार्यरत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपण शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्याने ट्विटरने तो व्हिडिओच डीलीट केल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच रवीशंकर प्रसाद आणि आपले अकाऊंट का लॉक केले याचा जाब विचारण्यासाठी संसदीय समितीचा अध्यक्ष म्हणून आपण ट्विटरला नोटीस बजावणार असल्याचे थरुर यांनी सांगितले आहे. ट्विटर भारतात कोणत्या कायद्यांचे आधारे काम करत आहे याचाही जाब विचारणार असल्याचे थरुर यांनी सांगितले आहे.



Updated : 25 Jun 2021 5:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top