Home > Election 2020 > 'हे' आहेत शिवसेना वचननाम्यातील १२ महत्त्वाचे मुद्दे:

'हे' आहेत शिवसेना वचननाम्यातील १२ महत्त्वाचे मुद्दे:

हे आहेत शिवसेना वचननाम्यातील १२ महत्त्वाचे मुद्दे:
X

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना (ShivSena) पक्षाने आपला जाहीरनामा आज मातोश्री येथे प्रसिद्ध केला असुन जी वचने आम्ही दिली आहेत ती आम्ही पूर्ण करणार आहोतच असं आश्वासन पत्रकार परिषदेत दिलं आहे.

“हा वचननामा महिला आणि शिवसेना नेते यांनी मिळून बनवलेला आहे आणि यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार नाही याची काळजी घेवून आम्ही वचने दिली आहेत” असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं.

हे आहेत शिवसेना वचननामा पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

- १० रुपये मध्ये आम्ही सकस आहार देणार आहोत.

- १ रुपये मध्ये २०० आरोग्य चाचण्या करण्यात येणार आहेत

- आरे बाबंत सर्व पक्षानी आपली भूमिका सांगावी , चर्चा करायला आम्ही तयार आहोत.

- ज्येष्ठ नागरिक महिला तरुण या सर्व घटकांचा आम्ही विचार केलेला आहे.

- भूमिपुत्रांच्या न्यायाबाबत बाळासाहेब ५० वर्षांपूर्वी जे बोलले त्या बाबत इतरांना आता जाग आली आहे.

- राम मंदिर बाबत आता बोलू शकत नाही आचार सहिंतेचा भंग होईल.

- हा वचननांमा पूर्ण विचार करून सरकारी तिजोरीवर भार न पडता तयार केलेला आहे.

- शेतकऱ्यांना कमी दरात खत इलेक्ट्रिसिटी, कमी दरात जेवण, आरोग्य सेवा अशा काही गोष्टी आहेत.

- ५० हजार किलोमीटर चे रस्ते आपण व्यवस्थित करणार आहोत.

- गाव शहरांमध्ये रस्त्यांसाठी निधी देण्यात येईल.

- महिला बचत गट यांचा समावेश करून कमी दरात जेवण देण्यात येईल.

- महाराष्ट्राच्या जनतेला हा वचननामा पूर्ण करण्यासाठी आम्ही भाजपा सोबत एकत्र काम करू आणि महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मार्गी लावू.

Updated : 12 Oct 2019 2:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top