तब्बल दोनवर्षांनंतर देहुमध्ये ग्यानबा तुकाराम गजर दुमदुमला
X
आज तुकाराम बीज,यामुळे देहुमध्ये संत तुकाराम महाराजांचा बीजोत्सव पार पडत असतो.परंतु गेल्या दोन वर्षांपासुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर थाटामटात साजरा करण्यात आला नव्हता,त्यावर अनेक निर्बंध होते.दोन वर्षांनंतर देहुनगरीत ग्यानबा तुकारामाच्या गजरा घुमु लागला आहे.
यावर्षी कोरोना आटोक्यात आल्याने वारकऱ्यांना देहुमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.वारकऱ्यांना हा सोहळा अनुभवण्यास मिळत आहे.देहू नगरी ग्यानबा तुकारामाच्या गजराने दुमदुमून गेली आहे.३६४ सदेह वैकुंठगमन सोहळा पार पडत आहे.
दोन वर्षांनतर देहुनगरीत जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बिजोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे.यावर्षी कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन वारकरी देहूत दाखल झाले आहेत.याचपार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
दरवर्षीपेक्षा अधिक संख्येने वारकरी देहूत दाखल झाल्याने देहू तुकोबांच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. संत तुकाराम महाराज संस्थान कडून बिजोत्सवानिमित्त मंदिरावर विद्युतरोषणाई करण्यात आली होती.