'पुछता है भारत' म्हणत रोहित पवारांचा अर्णबवर निशाणा
X
'रिपब्लिक टीव्ही' चे कार्यकारी संपादक यांचं टीआरपी घोटाळ्यासंबंधीत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यामधील व्हॉट्सअॅप संभाषण व्हायरल झालं आहे. त्यानंतर आता अर्णब गोस्वामी यांच्यावरही पार्थ दासगुप्ता यांच्याप्रमाणे कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.
लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावं.
फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, 'यही पुछता है भारत! असं म्हणत अर्णब गोस्वामीवर कारवाई होणार का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.