Home > News Update > #TRPSCAM : पार्थो दासगुप्तांचा जामीन अर्ज फेटाळला, अर्णबच्या अडचणी वाढल्या?

#TRPSCAM : पार्थो दासगुप्तांचा जामीन अर्ज फेटाळला, अर्णबच्या अडचणी वाढल्या?

#TRPSCAM : पार्थो दासगुप्तांचा जामीन अर्ज फेटाळला, अर्णबच्या अडचणी वाढल्या?
X

टीआरपी घोटाळ्यामधील मुख्य आरोपी बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. मुंबई पोलिसांतर्फे दासगुप्ता यांना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तीवाद करण्यात आला. त्यासाठी सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दासगुप्ता आणि अर्णब यांच्यातील जवळीक दाखवण्यासाठी त्या दोघांच्या वॉट्सअप चॅटमधील काही भाग वाचून दाखवला.

पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात अर्णब आणि दासगुप्ता यांच्यातील वॉट्सअप संभाषणाचा उल्लेख केला आहे. यामध्ये अर्णबने दासगुप्ता यांच्यासाठी PMOमध्ये लॉबिंग करण्याची तयारी दाखवल्याचा दाखला देण्यात आला आहे. तसेच या दोघांमध्ये टाईम्स नाऊपेक्षा रिपब्लिकचा टीआरपी वाढवण्यासंदर्भातही चर्चा झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यामुळे दासगुप्ता यांना जामीन दिला तर ते याप्रकरणातील साक्षीदारांना धमकावू शकतात असा दावाही वकिलांनी जामिनाला विरोध करताना केला.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी, बार्कचे माजी सीसीओ रोमिल रामगडीया आणि माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या सगळ्यांनी संगमनत करुन टीआरपी घोटाळा केला आणि रोमिल रामगडीया यांनी रिपब्लिकला प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी इतर चॅनेलचे टीआरपी कमी दाखवले असाही आरोप ठेवण्यात आला आहे.

रिपब्लिक वाहिनी सुरू झाल्यापासून ४० आठवड्यांपर्यंत टीआरपीमध्ये वाढ झाल्याचे दाखवण्यात आले होते. सरकारी वकिलांनी सुनावणीमध्ये अर्णब गोस्वामीचे नाव घेतल्याने आता अर्णब पुढच्या अडचणी वाढल्या आहेत.

Updated : 20 Jan 2021 5:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top