कौतुक: छत्तीसगढ पोलिसदलात 13 किन्नरांची कॉन्स्टेबलपदी निवड
X
तृतीयपंथीय देखील समाजाचा भाग आहे. याची जाणीव आता समाजाला झाली आहे. तृतीयपंथी आता निवडणूका लढवून राज्यकर्ते झाले आहे. माध्यमांमध्ये पत्रकार, कलाकार म्हणून काम करत आहे. मात्र, सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांना फारसं सामावून घेतलं जात नाही. तृतीयपंथीयांना जगण्याची समान संधी दिली जात नाही. असं सातत्याने बोललं जातं.
मात्र, छत्तीसगढ पोलिसांनी सामाजीक चालीरीतीला छेद देत 13 किन्नरांची कॉन्स्टेबलपदी नियुक्ती केली आहे. यातील 8 जण रायपूरचे आहेत तर दोन जण राजनांदगाव जिल्ह्यातील आहेत. कोरबा, सरगुजा आणि बिलासपूर या तीन जिल्ह्यातून प्रत्येकी एक असे 13 जण आता छत्तीसगढ पोलिस दलात सहभागी झाले आहेत. या सर्व उमेदवारांनी योग्य त्या परीक्षा दिल्या असून त्यांनी सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्यानंतरच त्यांची नोंद घेण्यात आली आहे. छत्तीसगढ पोलिस दलामध्ये किन्नरांना स्थान दिल्यानंतर विविध सामाजिक संघटनांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे.