Home > News Update > दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट

दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट

दिंडोरी तालुक्यात विधी मंडळातील सदस्य पंचायत राज दौरा सुरू झाला असून , त्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट झाला आहे.

दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट
X

नाशिक : दिंडोरी तालुक्यात विधी मंडळातील सदस्य पंचायत राज दौरा सुरू झाला असून , त्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट झाला आहे. दिंडोरी तालुक्यात 10 प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या आरोग्य केंद्रांमध्ये पंचायत राज दौऱ्यात आमदार भेट देणार असल्याचे समजल्यानंतर तालुक्यातील आरोग्य केंद्राचा कायापालट झाला आहे.

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात रंगरंगोटी तसेच पोस्टर, बॅनर व रुग्ण तपासणी कक्ष, लॅब, औषध, निर्माण अधिकारी कक्ष यांची आणि परिसराची साफसफाई करत रांगोळी काढून सुसज्ज करण्यात आली आहे.

त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा आवार जणू काही रुग्णाला खासगी दवाखान्याचा आवर असल्याचे भासत असल्याचे नागरीकांनी म्हटले आहे.

केवळ दौरा आहे म्हणून अशी तयारी न करता प्रत्येक दिवशी निदान स्वच्छता करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे, सोबतच दरवर्षी पंचायत राज दौरा झाला तर नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक आरोग्य केंद्रांचा विकास होईल असेही नागरिकांनी यावेळी सांगितले आहे.

Updated : 28 Aug 2021 2:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top