Home > News Update > राष्ट्रीय महामार्गावरच मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहनधारकांची कसरत

राष्ट्रीय महामार्गावरच मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहनधारकांची कसरत

बीड शहरातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांने ठिय्या मांडत असल्याने वाहन धारकांसह पदचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राष्ट्रीय महामार्गावरच मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहनधारकांची कसरत
X

बीड शहरातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांने ठिय्या मांडत असल्याने वाहन धारकांसह पदचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या जनावरांची कोंडवाड्यात रवानगी करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

बीडच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोरून बीड औरंगाबाद या शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग जातो. याच राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला आहे. परिणामी वाहतूक कोंडीसह, वाहनधारकांना कसरत करून आपली वाहन चालवावी लागता आहेत.

शहरातील सुभाष रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मंडई, जालना रोड, नगररोड या मुख्य रस्त्यावर ही जनावरं ठाण मांडून आहेत. यामुळे जनावरांच्या अपघातासह वाहनांचा देखील अपघात होऊ लागले आहेत. या जनावरांसाठी नगरपरिषदेकडून नेहरू नगरमध्ये कोंडवाड्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून कोंडवाडा बंद असल्याने तिथे जुगार अड्डा झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही जनावरं रस्त्यावर पहायला मिळत असून जनावरांची कोंडवाड्यात रवानगी करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

Updated : 22 Aug 2021 3:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top