Home > News Update > दिल्ली हिंसाचाराशी दिशा रवीच्या संबंधांचा प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नाही, कोर्टाचे निरीक्षण

दिल्ली हिंसाचाराशी दिशा रवीच्या संबंधांचा प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नाही, कोर्टाचे निरीक्षण

दिल्ली हिंसाचाराशी दिशा रवीच्या संबंधांचा प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नाही, कोर्टाचे निरीक्षण
X

Toolkit प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दिशा रवीच्या जामीनअर्जावर दिल्ली सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये वकिलांनी दिशा रवी हिचा खलिस्तान वाद्यांशी संबंध आहे आणि त्यांच्या मदतीनेच दिशाने टूलकिट तयार केले होते, ज्याद्वारे दिल्लीत हिंसाचार घडवण्यासाठी कट रचण्यात आला असा आरोप केला. तसेच दिशा रवीने तयार केलेल्या टूलकिटमधील काही गोष्टींचा संदर्भ या युक्तीवादामध्ये देण्यात आला. पण यावेळी कोर्टाने २६ जानेवारीचा हिंसाचार आणि दिश रवी यांचा थेट संबंध असल्याचे कोणते पुरावे आहेत का अशी विचारणा केली, तेव्हा याबाबतचे पुरावे सध्या नसून तपास सुरू आहे असे सांगण्यात आले.

तसेच याप्रकऱणातील आणखी दोन आरोपी निकीता आणि शंतनू यांच्याही ती संपर्कात होती, असा दावा वकिलांनी केला. पण यावर या तिन्ही आरोपींचे दिल्ली हिंसाचार घडवणाऱ्यांसोबत थेट संबंध असल्याचे पुरावे आहेत का अशी विचारणा कोर्टाने केली. पण वकिलांना त्याचेही उत्तर देता आले नाही. पण खलिस्तानवाद्यांसारख्या देशविरोधी शक्तींसोबत मिळून देशात अराजक माजवण्याचा डाव होता असा आरोप पोलिसांनी केला आहे.

तर दिशाच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दिशाचा केवळ शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. खलिस्तानी संघटना पोएटिक जस्टीस फाऊंडेशनशी तिच्या संबंधांचे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच शेतकऱ्यांचे आंदोलन हा जगभरात देशद्रोह म्हणून मांडले जात असेल तर ते मी जेलमध्येच राहिलेले बरे असे दिशाचे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ अग्रवाल यांनी म्हटले. तर दिल्ली पोलिसांनी टूलकिटच्या माध्यमातून देशामध्ये अराजक माजवण्याच्या कटाच्या चौकशीसाठी दिशाला जामीन देण्यास विरोध केला आहे. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला आणि २३ तारखेला निर्णय देणार असल्याचे सांगितले.

Updated : 20 Feb 2021 5:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top