#Toolkit – बीडच्या शंतनूला हायकोर्टाचा ट्रान्झिट जामीन
X
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या Toolkit प्रकरणी दिशा रवीनंतर निकीता जेकब आणि Shantanu यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी वॉरंट काढले आहे. पण याप्रकरणी बीडमधील शंतनू मुळूक या तरुणाला औरंगाबाद कोर्टाने दिलासा दिला आहे. शंतनू मुळूक याला १० दिवसांचा ट्रान्झिट जामीन मंजूर करण्यात आला आहे. म्हणजे आता शंतनूला दिल्ली पोलीस अटक करु शकणार नाहीत तर शंतनू स्वत: दिल्लीला जाऊन पोलिसांपुढे हजर राहू शकणार आहे किंवा दिल्लीच्या कोर्टातही तो जाऊ शकणार आहे, अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली आहे.
शंतूनच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांची टीम बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी येऊShantanuन गेली. दिल्ली पोलिसांनी शंतनूच्या घराची तपासणी केली असून शंतनूच्या आई -वडिलांची चौकशी केली आहे. तसेच बँकेत जाऊन देखील खात्यांचा तपशील घेतला आहे. पण शंतनूची नाहक बदनामी केली जात असून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणूनच हा गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
शंतनू हा बी ई मॅकेनिक आहे. तसेच त्याने अमेरिकेत पदवी घेतली असून तो पर्यावरण संवर्धना संदर्भात राष्ट्रीय पातळीवर काम करतो. "शेतकरऱ्यांसंदर्भात तळमळ असून शेतकरी आंदोलनाला शोषल मीडियाच्या माध्यमातून तो पाठींबा देत होता. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मी शेतकऱ्याची मुलगी म्हणून पाठींबा दिला आहे. मात्र त्यामुळं आमची चौकशी केली जातेय, असा आरोपही त्याच्या आईने केला आहे.