Home > News Update > आधी तोटा, आता फायदा; शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

आधी तोटा, आता फायदा; शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

आधी तोटा, आता फायदा; शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान
X

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दोन महिन्यापुर्वी टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याने टोमॅटोने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवलं होतं. मात्र त्यानंतर आता टोमॅटोला चांगला दर मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सध्या टोमॅटोचे दर 135 चे 140 रुपयांवर पोहचले आहेत. त्यामुळे टोमॅटोचे दर गगनाला भिडले, टोमॅटोला सोन्याचा भाव अशा हेडलाईन्स देण्यात येत आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यापुर्वी टोमॅटो आणि कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले होते. त्यामुळे सध्या ज्या पद्धतीने टोमॅटोचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होत नाही. कारण दोन महिन्यांपुर्वी घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला होता. मात्र आता या नव्या दरामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

याबरोबरच टोमॅटोचा हा वाढलेला दर आणखी एक महिनाभर राहू शकतो, अशी माहिती नाशिक बाजार समितीचे अध्यक्ष देविदास पिंगळे यांनी दिली.

Updated : 28 Jun 2023 8:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top