इंधनात दरवाढ, महाराष्ट्रात 108 रू प्रतिलीटर पेट्रोल
X
कोरोना महामारी , त्यातच पावसाची अतिवृष्टीमुळे आलेला महापूर 1 लाखाहून अनेकांचे स्थलांतर 79 लोकांचा मृत्यू हे सर्व घडत असताना महागाईचे चटके अधिकच बसू लागले आहेत. कोरोनासंकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या बेकारी वाढत असताना देशासह महाराष्ट्रात सातत्याने इंधनात दरवाढ दिसून येत आहे . सर्वाधिक दरवाढ ही भोपाळमध्ये प्र.लि.110.20 रुपये झाली असून त्या सोबतच मुंबई प्र.लि. 107.83 रुपये तर दिल्लीत 107.84 रुपये सद्यस्थितीत मोजावे लागणार आहेत. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100 प्र.लि गेले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा दर हा मुंबई: पेट्रोल- 107.83 , डिझेल 97.45 , पुणे: पेट्रोल- 107.56 , डिझेल 95.71 , नाशिक: पेट्रोल- 107.70, डिझेल 95.85 , औरंगाबाद: पेट्रोल- 109.12, डिझेल 98.69 , कोल्हापूर: पेट्रोल- 107.80, डिझेल 95.97 हे नवे दर महाराष्ट्रात दिसतील, तर पेट्रोल-डिझेलमध्ये 17 जुलैला दरात शेवटची दरवाढ करण्यात आली होती.