Home > Election 2020 > साहेब, आज आम्ही तुमचं ऐकणार नाही, जितेंद्र आव्हाडांचं भावनिक ट्विट

साहेब, आज आम्ही तुमचं ऐकणार नाही, जितेंद्र आव्हाडांचं भावनिक ट्विट

साहेब, आज आम्ही तुमचं ऐकणार नाही, जितेंद्र आव्हाडांचं भावनिक ट्विट
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार आहेत. यावेळी ईडी कार्यालयाबाहेर गर्दी करु नये असं आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची माफी मागत ईडी कार्यालय परिसरात येणार असल्याचं म्हटलंय.

‘महाराष्ट्र घडवताना तुमच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाचे ऑपरेशन, पायाला झालेली इजा एवढं सगळं असताना वयाच्या ७९ व्या वर्षी तुम्ही तुम्ही लढताय. हे सर्व त्रास तुम्ही आमच्यासाठी सोसले आहेत. गेली ३५ वर्ष तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकलं पण, माफ करा साहेब यावेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे ऐकणार नाही’ या आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1177232609442582533

ईडीने गुन्हा नोंदवल्यानंतर आपण स्वतःहून ईडी कार्यालयात जाऊन चौकशीला सामोरे जाणार असल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर आज ईडी कार्यालय परिसरात कलम १४४ लागू करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईच्य़ा दिशेने येत आहेत.

Updated : 27 Sept 2019 11:03 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top