आज शेतकरी संघटनांसह विविध संघटनांची 'भारत बंद' ची हाक
X
केंद्र सरकारच्या तीन नवे सुधारित कृषी कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज शेतकरी संघटनांनी तसेच विविध संघटनांनी 'भारत बंद' ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह इतर भागात बंदोबस्त वाढविण्यात आला. राज्यातील शेतकरी संघटना आणि तसेच इतर पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. याचा परिणाम राज्यातील अनेक बाजार समित्या, शहरातील मुख्य मार्केटवर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
केंद्र सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात लढा सुरू ठेवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे.
या शेतकरी आंदोलनात 40 पेक्षा जास्त शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने सहभाग घेत या भारत बंदमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत आज कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्ली शहराच्या सीमेवर तीन ठिकाणी आंदोलन करणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.