एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची आज अंतिम मुदत; उद्यापासून कारवाईचा बडगा
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सेवा ठप्प आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आज (23 डिसेंबर) ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
X
मुंबई // एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सेवा ठप्प आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आज (23 डिसेंबर) ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. आज कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर उद्यापासून पुन्हा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई होऊ शकते, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान एसटीचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीवर आंदोलक एसटी कर्मचारी अद्यापही ठाम आहेत. संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने सोमवारी संप मागे घेण्याची घोषणा केली होती. एसटी कर्मचारी संघटना आणि एसटी महामंडळात झालेल्या बैठकीदरम्यान निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या याप्रकरच्या कारवाया मागे घेण्यावर चर्चा झाली. दरम्यान निलंबन मागे घेतले जाईल, मात्र दोन दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते. मात्र आज अंतिम मुदत संपत असून देखील कामावर हजर कर्मचाऱ्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे जे कर्मचारी उद्या कामावर हजर होणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मात्र तरी देखील एसटी कर्मचारी हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत जोपर्यंत विलिनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.