आ. माधुरीताई मिसाळ करणार 'त्या' प्रकरणाची चौकशी
पिंपरी-चिंचवड स्थायी समिती अध्यक्षांविरुद्ध झालेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी आ. माधुरीताई मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 19 Aug 2021 3:08 PM IST
X
X
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना सुनियोजित षडयंत्र आखून जाळ्यात अडकविल्याचे म्हणत या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन या कटकारस्थानाचा मूळ शोधण्यासाठी भाजपाच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आ. माधुरीताई मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
आ. माधुरीताई मिसाळ उद्या (दि. 20 ऑगस्ट ) पिंपरी-चिंचवडला जाणार असून, त्या सर्वांची भेट घेऊन या तक्रारी मागचे सत्य जाणून घेतील आणि त्याचा अहवाल माझ्याकडे सुपूर्द करतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या लोकप्रतिनिधींवर आरोप केले जात आहेत. त्यांना अडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र , आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे व लवकरच सत्य बाहेर येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.
Updated : 19 Aug 2021 3:08 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire