Home > Governance > ‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार - कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे

‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार - कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे

‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार - कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे
X

एकाच वेळी राज्यातील 10 हजार शेतकऱ्यांशी संवाद साधता येणाऱ्या ‘कृषी संवाद’ या उपक्रमाचा शुभारंभ आज कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला. यावेळी अमरावतीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांशी कृषिमंत्र्यांनी संवाद साधला.

या उपक्रमाच्या माध्यमातून कृषिमंत्री शेतकऱ्यांसोबतच कृषिमित्र, कृषी सहाय्यक यांच्याशी विविध बाबींवर संवाद साधणार आहेत. 7420858286 या टोल फ्री क्रमांकावर शेतकरी बांधवांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदी उपस्थित होते.

कृषी संवाद उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकाच वेळी हजारो शेतकऱ्यांशी संवाद साधतानाच कृषी सहाय्यक यांनादेखील वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. एखाद्या व्यक्तीला या उपक्रमांतर्गत संवाद साधायचा असल्यास तो शून्य क्रमांक दाबून कृषिमंत्र्यांशी थेट संवाद करु शकतो. हे संवाद केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त आलेले कॉल नोंद केले जातील व संबंधित कॉल करणाऱ्या व्यक्तीला संदेश पाठविण्यात येईल.

या संवाद केंद्रासाठी कृषिमंत्र्यांच्या मंत्रालयीन कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचे कॉल नोंदवून घेतले जातील. त्यानंतर एखाद्या शेतकऱ्याची तक्रार कुठल्या विषयाशी संबंधित आहे त्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला ही समस्या दोन दिवसांत सोडविण्यासाठी सांगितले जाईल. त्यानंतर संबंधित तक्रारदार शेतकऱ्याला त्याच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली, याबाबत माहिती दिली जाईल. अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

Updated : 14 Aug 2019 11:15 PM IST
Next Story
Share it
Top