राज्य पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर - मुख्यमंत्री
X
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जगभरातील इतर काही देशांमध्ये अजूनही लॉकडाऊन आहे. आपल्याला लॉकडाऊन करायचे नाहीये, पण त्यासाठी जननेते कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जगात सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट मोठी आहे, तशी लाट आपल्याकडे येऊ नये यासाठी सगळ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्य सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. पण लगेचच लॉकडाऊन केले जाईल असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिथे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत तिथे जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. पण संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय परस्पर घेऊ नये असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे. राज्यात सापडणारे ८० टक्के रुग्ण हे लक्षणं नसलेली आहेत. त्यामुले अनेक जण कोरोना असूनही बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर काही लोक कोरोनाची चाचणी करणे टाळत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. घरात रुग्ण असूनही लोक ते लपवत असल्याचे निदर्शनाल आले आहे. पण लोकांनी असे काही न करता सरकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, यामुळे ते आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवू शकतील असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच मास्क, सोशल डिस्टन्स हे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले.