सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्यानंतर ठाण्यात फेरीवाल्यांवर धडक कारवाई
X
ठाणे – ठाणे शहरातील घोडबंदर रोड भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई दरम्यान महापालिकेच्या सहायक आयुक्त kalpita-pimpleयांच्यावर हल्ला झाला. एका मुजोर फेरीवाल्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर आता ठाणे महापालिकेने अतिक्रमण आणि अनधिकृत फेरीवाले यांच्याविरोधात कडक कारवाईला सुरूवात केली आहे. गुरूवारी शहरातील विविध प्रभागातील फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये दुकानांच्या बाहेर फुटपाथवर ठेवलेला सामान, फुटपाथवर उभे असलेले स्टॉल्स पाडण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
घोडबंदर रोड भागातील कासारवडवील येथे सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत होती. यावेळी एका फेरीवाल्याने धारदार शस्त्राने पिंगळे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची तीन बोटं तुटली आहेत, तसेच त्यांच्या डोक्यालाही जबर मार लागला आहे. तसेच त्यांच्या बॉडीगार्डचेही एक बोट या हल्ल्यात तुटले होते. हल्लेखोराला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.