Home > News Update > ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
X

राबीडी येथील खत्री इमारतीचे तीन स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे, या घटनेत एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचं समजत आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

राबोडी येथील खत्री अपार्टमेंटच्या इमारतीच्या सी विंगचे तीन स्लॅब कोसळून खाली पडले त्यामध्ये तीन लोक जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केले असता रमिज शेख,अरमान तांबोळी यांचा मृत्यू झाला तर गॉस तांबोळी गंभीर जखमी आहेत.

सदर ठिकाणी नगरपालिका अधिकारी तसेच अग्निशमन दल अधिकारी एनडीआरएफ ठाणे पथक दाखल झाले असून,बिल्डिंगमधील 75 कुटुंबांना बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बिल्डिंग मधील रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्याचे काम सुरू असून, पुढील कारवाई महानगरपालिका अधिकारी यांचेशी समन्वय साधून करत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Updated : 12 Sept 2021 11:23 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top