Home > News Update > शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज

शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज काय आहे? सरकारची योजना? वाचा

शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज
X

शेतकऱ्यांना आता 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा विचार राज्यसरकार करत आहे. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सरकार आता शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बीनव्याजी कर्ज देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे.

या संदर्भात कृषीमंत्री दादाजी भुसे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय झाला. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन या निर्णयाला अंतिम स्वरुप दिलं जाणार आहे.

या पुर्वी या योजनेअंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जात होते. मात्र, या वर्षीपासून शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी दिलं जाणार आहे.

Updated : 10 Feb 2021 9:13 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top