जालन्यात तीन सख्ख्या भावांचा शॉक लागून मृत्यू : उर्जामंत्र्यांचे चौकशीचे आदेश
X
राज्यात वीजदरवाढीचं आंदोलन सुरु असताना ग्रामीण महाराष्ट्रात भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जालन्यामध्ये विजेचा शॉक लागून तीन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे घडली आहे. उर्जामंत्री डॉ. नितिन राऊतांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
जालन्यामध्ये विजेचा शॉक लागून तीन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे घडली आहे. रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी हे तिघं भाऊ गेले असताना मोटर चालू करताना शॉक लागल्याच प्राथमिक अहवालात पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेमध्ये ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव 27वर्षे, रामेश्वर आप्पासाहेब जाधव 24 वर्षे आणि सुनिल आप्पासाहेब जाधव अशी मृत भावांची नावं आहेत. महावितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे ३ भावांचा मृत्यू झाला असून कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहाला हात न लावण्याची भूमिका स्थानिक नागरिकांनी तसेच मराठवाडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन ढेगळे पाटील यांनी घेतली होती.