बुल्ली अॅप प्रकरणी तिघेजण अटकेत : मुंबई पोलिस आयुक्त
X
अल्पसंख्याक महीलांच्या बदनामीच्या उद्देशानं तयार केलेल्या बुल्ली अॅप प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आले असून याबाबत नागरीकांना काही माहीती असल्याच कळवावी असं मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंनी सांगितलं.
सोशल मीडियावरच्या काही विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो साईटवर अपलोड करण्यात आले होते. त्यांच्या भावना दुखावतील असे मेसेज साईटवरुन प्रसारीत करण्यात आले. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला. 31 तारखेला अॅप लोड करण्यात आला होता. या ऍप आणि ट्विटर हॅन्डलची चौकशी मुंबई पोलिसांनी केली. बुल्ली बाई नावाचं ट्विटर हॅन्डलही तयार करण्यात आलं होतं. ही वेबसाईट जी होती, ती जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, असा उद्देश ठेवून हे सगळं करण्यात आलं. याचे फॉलोअर्स कोण आहे, त्याची माहिती काढून त्यांच्या मागावर पोलिस लागले, असं नगराळे म्हणाले.
बंगलोरमधे दुसऱ्या वर्षाला शिकणारा इंजिनिअरींगचा तरुण विशाल कुमार झा चा तपास केला. एकूण पाच फॉलोअर्स होते. त्यांचा शोध घेतला गेला. ज्यांच्या नावानं ट्वीटर सुरु करण्यात आलं होतं, त्यांना एक एक ताब्यात घेतलं गेलं. आतापर्यंत तिघांना ताब्यात गेतलं. विशाल झा याला ताब्यात घेतलंय. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तरा सिंहला उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर तिसऱ्या आरोपीलाही उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणात ज्या नागरिकांना माहिती द्यायची आहे, त्यांनी आमच्या वेबसाईटवर माहिती द्यावी. या माहितीच्या मदतीने आम्हाला या प्रकरणाच्या मुळाशी जाता येईल, असं हेमंत नगराळे म्हणाले.