नांदेडमध्ये हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरले NEET चे विद्यार्थी
X
नीट 2024 च्या कथित भ्रष्टाचारा विरोधात संताप व्यक्त करत निट परीक्षेची तयारी करणारे हजारों विद्यार्थी नांदेड येथे रस्त्यावर उतरले आहेत.केंद्र सरकार विरोधात व NTA विरोधात घोषणाबाजी करत हजारों विद्यार्थ्यांनी आज शहरातील मुख्य रस्त्यावर निषेध आंदोलन केलय. नीटची झालेली संपूर्ण परीक्षा ही सदोष असुन सदर परिक्षा ही NTA कडून न घेता सीबीएससी कडून घेण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढलाय.तर नीट भ्रष्टाचाराचे पैसे लोकसभा निवडणूकीत वापरल्याचा गंभीर आरोपही यावेळी विविध क्लासेस संघटनांनी केलाय.दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एस आय टी गठीत करून निकालाची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय.
निट परीक्षेच्या निकाला विरोधात आज नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.नांदेड शहरातील भाग्यनगर मधून निघाला मोर्चा, आयटीआय कॉर्नरला समारोप करण्यात आला. विद्यार्थी व क्लासेस संघटनेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात दहा ते पंधरा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय. याविषयीची माहिती घेतलीय आमचे प्रतिनिधि धनंजय सोळंके यांनी.