ज्यांनी पसरवले विष.. ते म्हणतात, `आता सकारात्मकता ठेवा`!
X
जागतिक महामारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाच्या नेतृत्वाचे आणि आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे जागतिक पातळीवर निघत असताना देशातील माध्यमं आणि समाजमाध्यमातून मान्यवर मंडळी `सिस्टिम` ला दोष देत जळत्या सरणांचे फोटो प्रसिध्द करु नका, `पॉझिटीव रहा` असे उपदेश देत आहेत. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर आणि मरणाची झुंज देणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या वेदनेवर मायबाप सरकार कधी फुंकर घालणार आहे प्रश्न अनुत्तरीत आहे.
भारतात सलग पाचव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. भारतात गेल्या २४ तासांत साडे तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. १५ एप्रिलपासून भारतात दोन लांखाहून अधिक रुग्ण आढळत असून तीन लखांहून अधिक रुग्ण आणि दोन हजारांपेक्षा जास्त मृत्यू होण्याचा हा सलग पाचवा दिवस आहे.
देशातील पंतप्रधान आणि प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना आणि कुंभमेळा जोरात साजरा होत असताना जगभरातील माध्यमांनी मागील आठवडाभरात जगभरातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर ' भारतात कोरोनाचा सुनामी' असं सांगत 'चिंताजनक परिस्थिती असल्याचे ठळक वर्णन केले आहे.
विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या कोरोना स्थितीवर उकठोर शब्दात प्रहार केले जात असताना, देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, आरोग्य सुविधांसह औषधांचा तुटवडा, करोनाबाधितांचे होत असलेले हाल… यावरून मतं मांडणाऱ्या आणि करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते व अभिनेत्यांसह काही जणांनी केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यास केंद्राने ट्विटरला सांगितलं. त्यावरून काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक देखील करण्यात आले आहेत.
कट्टर उजव्या विचारणीच्या प्रचारक असलेल्या पुण्यातील लेखिका शेफाली वैद्य यांनी कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या स्मशानभुमी आणि मृतदेहांचे फोटो शेअर करु नयेत असं ट्विटरवर आवाहम केलं आहे. हे सगळा `पॅंडेमिक पॉर्न`चा प्रकार असून यामुळे जनतेमधे घबराट निर्माण होते. असे फोटो व्हिडीओ शेअर करण्यापेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या लोकांचे सकारात्मक फोटो- व्हिडीओ शेअर करावेत असं आवाहन शेफाली वैद्य यांनी केलं आहे.
लोकशाही हा शासनाचा असा प्रकार आहे जेथे सर्वोच्च शक्ती ही सामुहिकपणे जनतेच्या हातात असते. जनतेकडेच अंतिम नियंत्रण असतं. कृपया थोडा अभ्यास करा." थांबेल ती कंगना कसली. सिंह यांच्या अभ्यास करण्याच्या सल्ल्यानंतर कंगनाने प्रतिक्रिया देत जनतेचा निर्णय नरेंद्र दामोदर मोदी असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, "जनतेचा निर्णय नरेंद्र दामोदर मोदी आहे. म्हणूनच ते पंतप्रधान आहेत. जो अभ्यास केल्यावर सर्व माहिती असतं पण काहीच कळत नाही अशा अभ्यासाचा काहीही उपयोग नाही. पुढच्या निवडणुकीत तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न करा तोपर्यंत त्यांना त्यांचं काम करु द्या." एकंदरीत कोरोनाची परीस्थिती बिकट असून जगभरातून देशाच्या नेतृत्वावर टिका होत असून मदत देऊ केली जात असताना भाजप समर्थक भक्तमंडळी आणि मान्यवर मात्र सत्य परीस्थिती स्विकारायला तयार नाहीत ,उलट सकारात्मक रहा, असा उरफटा सल्ला देत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे झालेल्या विध्वंसानंतर (Coronavirus in India) आता अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे मदतीचा ओघ सुरु झाला असतानाच आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगल जगातील दोन बलाढ्या कंपन्याही भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहे.
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नाडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करु तशी माहिती दिली. (Google CEO Sundar Pichai and Microsoft CEO Satya Nadella announce to help India in battle agains Coronavirus) भारतामधील सध्याची परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झाले आहे. अमेरिकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आभारी आहे. कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी आर्थिक मदत, वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या खरेदासाठी मायक्रोसॉफ्ट आवाज उठवत राहील, असे सत्या नाडेल यांनी सांगितले.