Home > News Update > कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोहरम साधेपणाने साजरा ; पोलिसांनी चढवली फुलांची चादर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोहरम साधेपणाने साजरा ; पोलिसांनी चढवली फुलांची चादर

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अहमदनगर शहरामध्ये मोहरम सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोहरम साधेपणाने साजरा करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोहरम साधेपणाने साजरा  ; पोलिसांनी चढवली फुलांची चादर
X

अहमदनगर : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अहमदनगर शहरामध्ये मोहरम सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, कत्तलीची रात्र पार पडल्यानंतर आज मोहरम विसर्जन संपन्न झाले, यावेळी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरवर्षी अहमदनगर येथे पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते सवारी वर फुलांची चादर अर्पण करण्याची प्रथा असते त्याप्रमाणे काल रात्री अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी सवारी वर फुलांची चादर अर्पण केली. तसेच नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील या ठिकाणी घेऊन सवारीचे दर्शन घेऊन चादर अर्पण केली.

मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेक सण, उत्सवांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे यंदा स्थानिक पातळीवर साधेपणाने उत्सव साजरे करावे असे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार यंदा अहमदनगर शहरात साधेपणाने मोहरम साजरा करण्यात आला.

नगर शहरातील कोठला परिसरात असलेल्या कोठला मैदानामध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला, यावेळी छोटे इमाम मिरवणूक काढण्यात आली व सवारीची स्थापना करण्यात आली या ठिकाणी असलेले ट्रस्टी व प्रतिष्ठित नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.

विसर्जन मिरवणूक संपल्यानंतरही संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी पेट्रोलिंग सुरु ठेवली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे . यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी मोहरम हे शांततेत पार पडले असल्याचे त्यांनी सांगितले व जनतेचे त्यांनी आभार मानले.

Updated : 20 Aug 2021 5:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top