परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून दुसरं समन्स ; 28 सप्टेंबरला होणार चौकशी
X
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेतेअनिल परब यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने त्यांना त्यांना मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून हे दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे. याआधी अनिल परब यांना समन्स बजावल्यानं राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझेंने अनिल परब यांच्यावर आरोप केलेले आहेत. त्यामुळे ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. मागच्या समन्सला हजर राहू न शकल्याने परब यांना आता ईडीकडून दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. अनिल परब व अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यासाठी २०-२० लाख रुपये घेतले होते', असं सचिन वाझेने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलेलं आहे.