शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी`भारत-बंद` पाळा: संजय राऊत
अकाली दलाच्या नेत्यांनी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर शिवसेनेने शेतकरी आंदोलना सक्रीय पाठींबा जाहीर केल्यानंतर आज शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी उद्याचा भारत बंद राजकीय नसून शेतकरी हितासाठी भारतबंद मधे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 Dec 2020 1:54 PM IST
X
X
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. आमचे तीन पक्ष इथे एकत्र आहेत. तिन्ही पक्षांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केला आहे. हा बंद फार वेगळा आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. हा कोणताही राजकीय बंद नाही.
एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही. तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी हा बंद पाळावा," असं आवाहनही संजय राऊतांनी केले. "कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही. हा विषय देशव्यापी झाला आहे. सरकारनं दिल्लीत मागच्या 12 दिवसांपासून दडपशाही सुरु केली आहे. म्हणून स्वेच्छेन या बंदमध्ये सहभागी व्हावं," असे आवाहन संजय राऊतांनी जनतेला केलं आहे.
Updated : 7 Dec 2020 1:54 PM IST
Tags: sanjay raut Shivsena Bharat band
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire