‘हे गोवा नाही महाराष्ट्र आहे, इथं काहीही खपवून घेतलं जाणार नाही’ - शरद पवारांची गर्भीत धमकी
X
आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या सर्व आमदारांनी एकत्र येऊन ग्रँड हयात येथे शक्ती प्रदर्शन केलं आहे. या शक्ती प्रदर्शनात अपक्ष आमदारही उपस्थित होते. यावेळी महाआघाडीच्या एकूण १६२ आमदारांनी एकत्र येत फोटोसेशन केलं आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना आश्वस्त करत दिल्लीला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
हे ही वाचा
97 हजार कोटी – 72 हजार कोटी = अजित पवारांवर आता 25 हजार कोटींचा आरोप
अजित पवार आणि भाजपा मध्ये नक्की डील काय झालंय…
Maha Political Twist LIVE: सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला, उद्या निकाल…
राज्यात भाजपाने अवैध पद्धतीने सत्तास्थापन केली आहे. बहुमत नसताना हे सरकार सत्तेत आलं आहे. कर्नाटक, गोवा, मणिपूर येथे बहुमत नसताना भाजपाने सरकार स्थापन केलं होतं. ‘हे गोवा नाही तर महाराष्ट्र आहे’ इथं काहीही खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी पुन्हा एकदा मोदी आणि अमित शाह यांना इशारा दिला आहे.
"सुप्रीम कोर्टाचा जो आदेश येईल तो पूर्णपणे पाळण्याची आपली तयारी आहे, अजित पवार यांचं वागणं पक्षाच्या विरोधात आहे, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
नव्या सदस्यांमध्ये व्हिपच्या मुद्द्यावरून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, अजित पवार यांना कुठलाही आदेश काढण्याचा अधिकार नाही. आम्ही वेगवेगळ्या लोकांची याबाबत मतं घेतली, त्यानुसार पक्षातून काढलेल्यांना अशा प्रकारचे अधिकार नाही. कुणावरही कारवाई होणार नाही याची मी स्वतः जबाबदारी घेतो.
असं म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना विश्वास दिला.