कुंभमेळ्यातील साधूंना क्वारंटाइन करा, अन्यथा कोरोनाचा प्रसाद वाटतील: किशोरी पेडणेकर
X
महाराष्ट्रामध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र तरीही पुणे आणि मुंबईमध्ये कोरोना रुग्ण वाढतांना दिसत आहे.
भारतामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता उत्तराखंड हरिद्वारमधील कुंभ मेळ्यावर अनेक मोठया नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि मदतीचे आवाहन केले. त्याचबरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी सुद्धा साधूंना वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावरून मदतीचं आवाहन केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हरिद्वारमधील कुंभमेळ्यातून येणारे साधू प्रसादाप्रमाणे कोरोना सगळीकडे वाटतील. प्रत्येक राज्याने येणाऱ्या साधूंना स्व-खर्चातून क्वारन्टाइन केलं पाहिजे. मुंबईमध्ये सुद्धा कुंभ मेळ्यावरून येणाऱ्या साधूंना क्वारन्टाइन कारण्याबाबत विचार सुरु आहे.
सद्य स्थिती पाहता महाराष्ट्रात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचं दिसून येत आहे. मुंबईत ९५ टक्के लोक निर्बंधांचं पालन करत आहेत. मात्र, उर्वरित ५ टक्के लोक नियम तर पाळत नाहीतच. पण बाकीच्यांसाठी धोका वाढवतायेत.
पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचे विचारसुद्धा त्यांनी व्यक्त केले. मुंबईत सध्या ८४ हजार कोरोना रुग्ण आढळले असून या भयावह परिस्थितीमुळे मुंबई टर्मिनल T१ एअरपोर्ट सुद्धा २१ एप्रिलपासून बंद करण्यात येणार असल्याचं दिसून येतंय.