शाहरुख खानच्या " पठाण"ला आता विरोध नाही , विश्व हिंदू परिषदेचा निर्णय.........
X
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण चित्रपट आज बॅाक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील गाण्यातील बोल आणि दृश्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. सेन्सॉर बोर्डाच्या सुचनेनंतर ही वादग्रस्त बोल व दृश्य काढुन टाकण्यात आल्या नंतर विश्व हिंदू परिषदेचा आता शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला विरोध करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काही दिवसापासुन पठाण हा चित्रपट त्यांच्या गाणीतील बोल आणि दृश्ये वादात सापडला होता. त्या चित्रपटातील गाण्यातील दृश्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या .सेन्सॉर बोर्डाच्या (Censor Board) सूचनेनुसार, या चित्रपटातील वादग्रस्त बोल व दृश्य काढुन टाकण्यात आली आहेत, त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने बॉलीवूड स्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' चित्रपटाला (Pathan Movie) विरोध करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे .यावर विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर म्हणाले की , विश्व हिंदू परिषदेचा सध्या पठाण चित्रपटाला विरोध नाही , आम्ही पुर्वी केलेल्या आक्षेृप लक्षात घेऊन चित्रपटात बदल केले आहे .चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह आढल्यास आम्ही त्यांचा विरोध करु असे नायर म्हणाले.
गुजरात सरकारने यापूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान मल्टिप्लेक्सच्या सुरक्षेचं आश्वासन दिलं होतं. विश्व हिंदू परिषदेच्या गुजरात युनिटनं मंगळवारी पठाण चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी विरोध मागे घेतला. आक्षेपार्ह गोष्टी काढल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेच्या गुजरात युनिटनचे सचिव यांनी एका निवेदनात म्हटले की , सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं (CBFC)पठाण या चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी सुधारीत केल्यानंतर उजव्या विचारसरणीचे गट यापुढं याला विरोध करणार नाहीत. दरम्यान शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा 'पठाण' चित्रपट आज २५ जानेवारीला बॅाक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे.