पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला काहीसा लगाम;मंगळवारी इंधनाचे नवे दर जाहीर
X
मुंबई : मागील काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला काहीसा लगाम बसला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. हे दर आज दिवसभरासाठी लागू असणार आहेत. याआधी सोमवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन दिवस इंधनाचे दर स्थिर राहिले आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.77 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलचा दर प्रतिलीटर 102.52 रुपये एवढा आहे. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.73 रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोलसाठी प्रतिलीटरला 105.84 मोजावे लागत आहे, तर डिझेलचा दर 94.57 रुपये इतका आहे. मात्र , जरी दरवाढीला लगाम लागला असला तरी मात्र सध्याच्या दराने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.