या ठिकाणी लावावे लागले 'नो किसिंग झोन' चे फलक
आता पर्यंत तुम्ही रस्त्यावर नो पार्किंग, नो स्मोकिंग झोन हे आणि असे अनेक फलक लावलेले बघितले असतील. मात्र, तुम्ही कधी ‘नो किसिंग झोन’ असा फलक बघितला आहे का?
X
मुंबई : आता पर्यंत तुम्ही रस्त्यावर नो पार्किंग, नो स्मोकिंग हे आणि असे अनेक फलक लावलेले बघितले असतील. मात्र मुंबईतील बोरवली पश्चिम येथील जॉगर्स पार्कच्या बाजूला चक्क 'नो किसिंग झोन' असा फलक लावण्यात आले आहेत.
आता हे फलक लावण्याची वेळी तेथील स्थानिकांवर का आली हे सांगताना जॉगर्स पार्कच्या बाजूलाच राहणाऱ्या कैलासराव देशमुख यांनी म्हटलं आहे की, या भागात दररोज अनेक जोडले अश्लील चाळे करतात, वारंवार सोसायटीतील नागरिकांनी त्यांना समाजावून सांगितले अनेक तक्रारी केल्या मात्र, हे युवक- युवती काही केल्या ऐकत नाहीत म्हणून सोसाटीतील नागरिकांना थेट रस्त्यावर नो किसिंग झोन असं लिहावं लागलं आहे.
मुंबईतील बोरवली हा उच्चभ्रु लोकांचा परिसर म्हणून गणला जातो. याच भागातील एका मोठ्या गार्डनच्या बाजूला अनेक जोडपे येतात, काही निवांत बसतात पणा त्यातील काही अश्लील चाळे करतात. यामुळे परिसरातील आजूबाजूचे रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महिला , लहान- मुले तसेच वयोवृध्द नागरिकांना याचा त्रास होत असल्याने सोसायटीने हा निर्णय घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले.