Home > News Update > टिटवाळ्यात महागाईच्या विरोधातील आंदोलनाच्या बॅनर चोरीची चर्चा

टिटवाळ्यात महागाईच्या विरोधातील आंदोलनाच्या बॅनर चोरीची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅस आणि खाद्यतेलाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईच्या विरोधात महाविकास आघाडीने टिटवाळ्यात आंदोलनाची हाक दिली होती. मात्र आंदोलनासाठी लावलेला बॅनरच चोरी गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.

टिटवाळ्यात महागाईच्या विरोधातील आंदोलनाच्या बॅनर चोरीची चर्चा
X

संपुर्ण देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. घरगुती गॅस, किराणा, भाजीपाला यासह पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. त्यापार्श्वभुमीवर ठाण्यातील टिटवाळा भागात महाविकास आघाडीने आंदोलनाची हाक दिली होती. मात्र आंदोलनासाठी लावलेला बॅनरच चोरी गेल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार होते. तर त्याचे शहरात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. तर हे आंदोलन 3 एप्रिल रोजी करण्यात येणार होते. मात्र हा बॅनरच चोरी गेल्याची घटना घडली आहे. तर ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्यामध्ये भुरटा चोर बॅनरची चोरी करून जाताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधातल्या आंदोलनाचे बॅनर चोर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या बॅनर चोरी झाल्याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस स्टेशन मध्ये महाविकास आघाडीने तक्रारही दाखल केली आहे. संबंधित तक्रारीची पोलीस निरीक्षक राजु वंजारी यांनी दखल घेऊन योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले, यावेळी महा विकास आघाडीचे स्थानिक नेते शिवसेना विभाग प्रमुख श्रीधर (दादा) खिस्मतराव, युवासेना सहसचिव व उपशहर संघटक ॲड. जयेश वाणी, युवासेना संघटक प्रवीण भोईक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभागीय अध्यक्ष मोरेश्वर (आण्णा) तरे, भारतीय राष्ट्रीय कॅांग्रेस वॅार्ड अध्यक्ष राजेश दिक्षीत, शिवसैनिक संतोष पवार याच बरोबर महा विकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 30 March 2022 8:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top