Maratha Reservation ; तरूणाने गळफास घेत संपवल जीवन ; जिल्हाधिकाऱ्यांनी केलं शांततेच आवाहन
X
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे मराठा आरक्षणाच्या उपोषणासाठी बसलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये असे या तरुणाचे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कामारी येथे साखळी उपोषण करीत असताना त्याने ऐन मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी दि. १७ सप्टेंबरच्या सायंकाळी स्वतःला गळफास घेऊन समाजासाठी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे कामारीसह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे सर्व मराठा समाज एकत्रित येण्याचे आवाहन केल्यानंतर मोठा जमावाकडून हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. यासदर्भात नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्याती तरुणांनी शांताता बाळगावी, भावनेच्या भरात अनुसुचित प्रकार करु नये असे आवाहन युवकांना केले आहे. तर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले की सुदर्शन देवराये यांच्या नावाने आकस्मत मृत्यू दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक दृष्ट्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसून येतंय. परंतु या मृत्यू प्रकरणी पुढील चौकशी करण्यात येणार असल्याचं देखी कोकाटे यांनी सांगितले.