पुण्याच्या उत्तरत पूर्व भागाचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार
X
पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आज पुण्याच्या उत्तरत पूर्व भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. लोहगाव, कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, विश्रांतवाडी, धानोरी,फुले नगर, येरवडा, तसंच नगर रस्त्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा आज बंद असणार आहे. भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या तातडीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर उद्या बुधवारी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे कळवण्यात आले आहे. त्यामुळे एक दिवस पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
दरम्यान यंदा पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने अनेक धरणं काठोकाठ भरल्याने पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा वर्षभराची प्रश्न मिटला आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नाही. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काळात सुरु राहणार असल्याने शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत शेती सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. म्हणून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.