Home > News Update > रोकडे गावातील पाणी ओसरले, मात्र नागरिकांच्या समस्या वाढल्या

रोकडे गावातील पाणी ओसरले, मात्र नागरिकांच्या समस्या वाढल्या

रोकडे गावातील पाणी ओसरले, मात्र नागरिकांच्या  समस्या वाढल्या
X

चाळीसगाव तालुक्यातील रोकडे गावामध्ये रात्री झालेल्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती होती, यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं,आता पाऊस ओसरला असला असून घरामध्ये शिरलेले पाणी काही प्रमाणात कमी होत आहे ,घरची परिस्थिती पाहून नागरिकांना रडू कोसळले आहे, या पुरसदृश्य परिस्थितीत अनेक जनावरांचा बळी गेलेला आहे.

आज सकाळपासूनच या गावातील नागरिक उपाशी पोटी आहेत, नागरिकांच्या घरामध्ये तीन ते चार फुटापर्यंत पुराचे पाणी होते, घरात असलेले अन्नधान्य पुरामुळे वाहून गेलेले आहे, पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नागरिकांना भटकंती करावी लागत आहे, प्रशासकीय अधिकारी जरी गावाला भेट देऊन गेले असले तरी अद्यापपर्यंत कोणतीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या नाहीत असं नागरिकांचे म्हणणे आहे.

रात्रीपासून खंडित झालेला विद्युत पुरवठा आत्तापर्यंत सुरळीत झालेली नाही यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, पुराचे पाणी जरी ओसरले असले तरी नागरिकांना आता अनेक साथीच्या आजारांची भीती वाटत आहे. त्यामुळे प्रशासनाने येथे आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Updated : 31 Aug 2021 6:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top