Home > News Update > 36 टक्के मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज, सेरो सर्वेक्षणातील निष्कर्ष

36 टक्के मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज, सेरो सर्वेक्षणातील निष्कर्ष

मुंबईत यंदा कोरोनाचे रुग्ण झोपडपट्ट्यांपेक्षा इतर भागांमधून जास्त आढळत असल्याची चर्चा होती. आता या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईत करण्यात आलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामुळे कोरोना विरोधातील लढाईची पुढची दिशा ठरवता येणार आहे.

36 टक्के मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज, सेरो सर्वेक्षणातील निष्कर्ष
X

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 36 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेल्याचे सेरो सर्वेक्षणातून उघड झाले आहे. कोविड साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे. ३६.३० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील सर्व विभागात १० हजार १९७ नागरिकांच्या रक्त नमुन्यांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली होती.

झोपडपट्ट्यांमधील पॉझिटीव्हीटी रेट घटला

मुंबई महापालिकेने केलेल्या सेरो सर्वेक्षणात बिगर झोपडपट्टी परिसरांमधून घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमधील सेरो सकारात्मकतेच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. तर झोपडपट्टी परिसरांमधील टक्केवारीत घट नोंदवण्यात आली आहे.

सर्वेक्षणातील निष्कर्ष

१. सेरो सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार पुरुषांमध्ये ३५.०२ टक्के इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली. तर महिलांमध्ये ३७.१२ टक्के इतकी सरो सकारात्मकता आढळून आली.

२. यंदाच्या सेरो सर्वेक्षणादरम्यान महापालिका दवाखान्यातून (Slum Area) घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये ४१ .६% इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली आहे. जुलै २०२० मध्ये करण्यात आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात झोपडपड्डी विभागांत ५७ टक्के होती. तर ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात ४५ टक्के इतकी सेरो सकारात्मकता झोपडपड्डी विभागांत आढळून आली होती.

३. खासगी प्रयोगशाळेतून (Non Slum Area) घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये यंदा २८.५ इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली आहे. जुलै २०२० मध्ये करण्यात आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात बिगर झोपडपट्टी भागातील टक्केवारी १६ टक्के होती. तर ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात १८ टक्के इतकी सेरो सकारात्मकता बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये आढळून आली होती.

४. यावरुन झोपडपट्टी परिसरातील सेरो सकारात्मकतेची टक्केवारी कमी होत असून बिगर झोपडपट्टी परिसरामध्ये सेरो सकारात्मकतेने मध्ये वाढ होत आहे. सध्या कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान बिगर झोपडपट्टी परिसरातून रुग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त आहे.

५. या सर्वेक्षणाच्या आधारावर कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात साबणाने धुवावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Updated : 24 April 2021 9:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top