Home > News Update > मंदिरं आणि धार्मिक स्थळं खुली करणार,पण नियम पाळावे लागणार

मंदिरं आणि धार्मिक स्थळं खुली करणार,पण नियम पाळावे लागणार

मंदिरं आणि धार्मिक स्थळं  खुली करणार,पण नियम पाळावे लागणार
X

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करताच ठाकरे सरकारने आता राज्यातली मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळं देखील खुली करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली सर्व धार्मिक स्थळं बंदच आहेत. सरकारच्या घोषणेनंतर ती 7 ऑक्टोबरपासून उघडली जातील. त्यामुळे भाविक भक्तांची एकाच वेळेस ठिकठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहेत. पण कोरोनाचे संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे धार्मिक स्थळं, त्यांची ट्रस्ट मंडळी, आणि प्रार्थनेसाठी येणाऱ्या मंडळींनी नेमके कोणते नियम पाळायचे याची एक नियमावलीच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. ज्यात,

1. धार्मिक स्थळांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व स्क्रिनिंगची व्यवस्था करणं अनिवार्य करण्यात आले आहे.

2. ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत, फक्त त्यांनाच धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रवेश देण्यात यावा.

3. मास्क घातलेल्या किंवा तोंड झाकलेल्या भाविकांच प्रवेश द्यावा

4.कोरोनाला रोखण्यासाठी सुचना देणारे फलक लावणं अनिवार्य, तसच ऑडिओ व्हिडीओही धार्मिक स्थळांमध्ये वेळोवेळी लावले जावेत.

5. एखाद्या मंदिरात, धार्मिक स्थळात एकाच वेळी किती जणांना प्रवेश द्यायचा ते ट्रस्टनं ठरवावं. व्हेंटिलेशन, उपलब्ध जागा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. अर्थातच त्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय ठेवावा.

6. प्रत्येकानं बुटं, चप्पला वाहनातच सोडाव्यात. कुटुंबियांनी आणि प्रत्येकानं ते स्वतंत्र ठेवावेत.

7. धार्मिक स्थळाच्या परिसरातली दुकानं, कॅफेटेरिया, स्टॉल्सनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं

8. येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रॉपर मार्किंग असावं

9. धार्मिक स्थळांत आत आणि बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असावेत.

10. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी 6 फुटाचं अंतर असावं. याची जबाबदारी धार्मिक स्थळांच्या मॅनेजमेंटची असेल.

11. लोकांनी प्रवेश करण्यापूर्वी साबनानं हात धुवावीत, सॅनिटायजर मारावा.

12. धार्मिक स्थळांमध्ये बसताना सोशल डिस्टन्सिंग पाळला जावं. परिसरात जास्तीत जास्त मोकळी हवा राहील याची काळजी घ्यावी. एसी 24 ते 30 अंश सेल्सि. एवढं ठेवावं.

13. मुर्ती, धार्मिक ग्रंथ, पुतळे यांना हात लावता येणार नाही.

14. धार्मिक स्थळांवर कोणताही मोठा कार्यक्रम घेऊ नये ज्यामुळे गर्दी होईल.

15. भजन, किर्तन किंवा इतर धार्मिक गायन पूर्णपणे बंद असेल. पण धार्मिक गीतं वाजवता येतील.

16. कॉमन प्रार्थना चटई टाळावी. भक्तांनी त्यांची स्वत:ची चटई किंवा तत्सम कापड सोबत घेऊन यावे.

17. धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद वाटणे, तुषार शिंपडणे अशा गोष्टी पूर्णपणे बंद असतील

असा पद्धतीने नियमावली सरकारने घालून दिली आहे, मात्र नागरिक या नियमांचे काटेकोर पालन करतात का हे पाहावं लागेल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सरकारकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सर्वच करत आहे.दरम्यान मंदिर व धार्मिक स्थळ खुली करण्याच्या सरकारच्या या निर्णयाचे तेथील व्यापारी, ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे.

Updated : 25 Sept 2021 6:37 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top