कल्याणचे तहसीलदार आणि शिपाई एसीबीच्या जाळ्यात
टीम मॅक्स महाराष्ट्र | 30 Aug 2021 7:51 PM IST
X
X
कल्याण : कल्याण तहसिल कार्यलयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे व शिपाई मनोहर हरड या दोघांना 1 लाख 20 हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण तालुक्यातील वरप गावातील जमिनीबाबत हरकतीवरील सुनावणीचे निकाल पत्र देण्यासाठीच्या पडताळणी दरम्यान तहसीलदार दीपक आकडे यांनी 1 लाखाची लाच मागितली होती तर शिपाई मनोहर हरड याने 20 हजारांची लाच मागितली होती.याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली, या तक्रारीनुसार आज सकाळी तहसील कार्यालयात एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचत तहसिलदार दीपक आकडे व शिपाई मनोहर हरड या दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
Updated : 30 Aug 2021 7:51 PM IST
Tags: Kalyan
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire