छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा विषय-पुरंदरे
छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा विषय आहे.अशा भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केल्या. शंभराव्या वर्षांत पदार्पण करत असताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
X
छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे त्यांचा अभ्यास करून , वाचन करून आणि लेखन करून स्वत: काही करी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला.मात्र, अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे, अशी भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे शंभराव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कालच पुण्यात त्यांना रांगोळी आणि दिपमानवंदना देण्यात आली. मी शंभर वर्षे जगावे ही त्या विधात्याची इच्छा होती. आणखी आयुष्य मिळाले तर स्वावलंबी जीवन लाभावे' अशी माझी इच्छा आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आयुष्याने मला खूप काही शिकवलं , मी अजूनही शिकत आहे असं ते म्हणाले.
सोबतच त्यांनी सर्वांना आपल्या आई वडिलांचा आदर करा असा सल्ला देत आपल्यासाठी राबणाऱ्या आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करणे योग्य नाही.असं म्हटलं.आई-वडिलांशी गोड बोला.आपल्या हातून कोणाचाही अपमान आणि कोणाचेही नुकसान होईल अस काम करू नका.असा सल्ला दिला.