Home > News Update > नौदलाचे वाढणार बळ

नौदलाचे वाढणार बळ

नौदलाचे वाढणार बळ
X

नवी दिल्ली -

भारतीय सैन्याच्या नौदलामध्ये 'तेजस ' ही ९७ लढाऊ विमाने आणि त्या सोबतच ' प्रचंड' ही १५० हेलिकॉप्टर खरेदी करण्यासंदर्भामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण साहित्य खरेदी परिषदेच्या बैठकीमध्ये संबंधित खरेदी प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

या हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून केली जाते. भारतीय लष्कराच्या नवदलाची ताकद अधिक पटीने वाढवण्यासाठी या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. संबंधित हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी साधारण दीड लाख कोटींचा खर्च येणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून समोर येत आहे.

सद्यस्थितीला हवाई दलाच्या ताफ्यामध्ये ८३ तेजस विमाने आहेत. दरम्यान नौदलाच्या तफ्यामध्ये एक विमाननौका देखील समाविष्ट केली जाईल. असे देखील समोर आले आहे. सामील होणाऱ्या या नौकामध्ये १४ विमाने सामावून घेण्याची क्षमता आहे.

Updated : 2 Dec 2023 1:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top