ऊसतोड मजुराचा, बांधकाम मजुराचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक, प्रतिकूल परिस्थितीत मिळवले यश
X
पाथरूड ( सावरगाव) :-
पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठरा विश्व दारिद्रय समाजातच नव्हे तर गावातही शिक्षणाचा अभाव, वडिलोपार्जित कोरडवाहू शेती, त्याच्यावर कुटुंबाची गुजरान् मात्र नुसती पोटाची आग विझली म्हणजे संसार होत नाही पोरांना शिकवण त्यांच्या उज्वल भवितेसाठी प्रयत्न करणे म्हणजे खरे पालकत्व. ती जबाबदारी ओळखून वडिलांनी ऊसतोड मजुराची उचल घेण्यास सुरुवात केली. ऊसतोड मजुराचे काम करत चार पैसे गाठीला बांधून सोमनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी सुनीता शिंदे यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिले आणि त्यांची चीज त्या तिन्ही मुलांनी उच्च शिक्षण घेत पूर्ण घेत केले. त्यातीलच त्यांचा मधवा मुलगा म्हणजे कुमार. प्रमोद सोमनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या क्रमांकांनी उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. ऊसतोड मजुराच्या , बांधकाम मजुराच्या, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुराच्या मुलाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश पाहून सारा गावं ( सावरगाव, पाथरूड ) तसेच आजूबाजूचा परिसर आनंदाने गहिवरून गेला आहे.
प्रमोद सोमनाथ शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण भूम तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावरगाव ( पाथरूड ) येथे झाले तर माध्यमिक आणी उच्च माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी झाले. तसेच पुढे त्यांनी पदवीचे शिक्षण 2018 साली बीएससी (रसायनशास्त्र) या विषयात जामखेड महाविद्यालय जामखेड येथून घेतले. तेथून पुढचा जो काही खर्च आहे तो प्रमोदच्या आईवडिलांना पेलणारा नव्हता म्हणून प्रमोदने जळगाव येथील दीपस्तंभ संस्थेमद्ये मध्ये बुद्धीच्या जोरावर त्यांची प्रवेश परीक्षा पास करून प्रवेश मिळवला. दीपस्तंभ संस्थेत जोराचा अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक ( Police Sub Inspector ) या पदाला त्याने गवसनी घातली आहे.
घरात दोन वेळ खायची वाणवा असे दिवस काढलेल्या प्रमोद यांनी मोठ्या जिद्दीने पदवीचे शिक्षण तर पूर्ण केलेच मात्र तब्बल 12 तास अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत हे यश मिळवले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व काबाडकष्ट करणारे माझे आई वडील हे प्रेरणास्रोत असल्याच ही यावेळी त्याने आवर्जून सांगितले.